हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच अनेकांचा कल बँकेचा एफडी करण्याकडे वाढत चालला आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा एका बचत योजनेची माहिती देणार आहोत, त्यात तुम्ही 45 रुपये गुंतवले तरी त्या बदल्यात तुम्हाला 45 लाख रुपये मिळतील. ही योजना नेमकी काय आहे त्याचा फायदा कसा घेता येईल याविषयी जाणून घ्या.
सध्या एलआयसीच्या लोकप्रिय योजनांमध्ये जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand Policy) सर्वात केंद्रस्थानी आहे. जर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त पैसे जमा करायचे असतील तर ही पॉलिसी तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय ठरेल. ही पॉलिसी एक बजाज योजनेसारखीच आहे. तोपर्यंत तुमची ही पॉलिसी लागू असेल तोपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. ही योजना तुम्हाला किमान 1 लाख रुपयांची खात्री देते. परंतु कमाल मर्यादा अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही.
महत्वाचे म्हणजे, जीवन आनंद पॉलिसीत तुम्ही महिन्याला 1358 रुपये गुंतवले तर त्या बदल्यात तुम्हाला 25 लाख रुपये मिळतील. महिन्याचे 1358 रुपये म्हणजेच दिवसाला 45 रुपये या पॉलिसीमध्ये गुंतवत असाल. एवढ्या कमी रक्कमेत तुम्हाला योजनेअंतर्गत तुम्हाला लाखो रुपये मिळतील. तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल ही पॉलिसी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
तसेच या पॉलिसीमध्ये पस्तीस वर्षांसाठी दररोज 45 रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 लाख 70 हजार 500 रुपये मिळतील.
पॉलिसीच्या मदतीनुसार तुमचे मुळे रक्कम पाच लाख रुपये असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी कालावधीनंतर 8.60 लाख रुपये
रिव्हिजनरी बोनस अणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल. त्यामुळे या पॉलिसीत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल.