पृथ्वीला मिळणार 2 चंद्र!! अवकाशात घडणार मोठी खगोलीय घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या सौरमालेमध्ये अनेक ग्रह तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करत असतात. सूर्यमालेत पृथ्वी, चंद्र, सूर्य यासोबत गुरु, शुक्र, शनि, बुध यांसारखे अनेक ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहाला त्यांच्याशी वेगळे काही चंद्र आहेत. शनी या गृहाभोवती 146 चंद्र फिरत असतात. तर पृथ्वीला केवळ एकच चंद्र आहे. आणि तो पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वीला एकच चंद्र आहे. हे शतकानुशतकापासून चालत आलेल्या एक मोठा सत्य आहे. पण आपल्या अवकाशामध्ये काहीतरी खगोलीय घटना घडत असतात. त्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतो. आणि अशातच या खगोलीय घटनेमुळे आता दोन महिन्यासाठी आपल्या पृथ्वीला आणखी एक चंद्र पाहायला मिळणार आहे. त्याला मिनी चंद्र असे नाव ठेवण्यात आलेले आहे. अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमिकल यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून अशी माहिती समोर आलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मिनी चंद्र 7 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्यांदा दिसलेला आहे.

त्यांनी दिलेल्या अहवालात असे सांगितले आहे की, अवकाशात जेव्हा कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यावर त्याच्या मार्गाला अनुसरून अशी वाटचाल करत असते. त्या वस्तूचा वेग हा पृथ्वीच्या सूर्यमालेत परिभ्रमणाच्या वेगाच्या तुलनेत खूप कमी असतो. त्यामुळे ही वस्तू ठरलेल्या मार्गाने पुढे निघून जाते. या घटनेला मिनीमुन असे म्हणतात. संशोधकांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही अवकाशातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यावेळी आपल्याला पृथ्वीला दोन चंद्र दिसतात.

हे कशामुळे घडते ?

मिनी चंद्र ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळते. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळामध्ये लघुग्रह हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येईल. त्यानंतर काही काळ हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरतील. परंतु त्याचे परिभ्रमण पूर्ण करणार नाही. या खगोलीय घटनेमुळे अवकाशात काही काळासाठी एक नवीन पाहुणा दिसेल तो अगदी चंद्रासारखा हुबेहूब दिसेल.तो चंद्राप्रमाणे असेल चंद्रापेक्षा त्याचा आकार खूप कमी असणार आहे. तो एका लघुग्रहाच्या रूपात सगळ्यांना दिसणार आहे.

शास्त्रज्ञांनी त्याचे नाव 2024 पिटी5 असे ठेवले आहे. हा लघुग्रह अवकाशात पहिल्यांदा 7 ऑगस्ट रोजी दिसला होता. त्यावेळी त्याचा व्यास 10 मीटर इतका होता. हा मिनी चंद्र खूपच लहान असणार आहे. त्यामुळे अगदी तुम्ही टेलिस्कोपने जरी पाहिले, तरी तो स्पष्टपणे दिसणार नाही. खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार असे मिनी मून याआधी देखील दिसले आहेत. या आधी अशा घटना 1981 आणि 2022 मध्ये घडलेले आहे. परंतु त्याचा आकार अगदी लहान होता. आणि वेग देखील जास्त होता त्यामुळे ओळखता आलेले नाही.