‘या’ राज्यांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के! व्हायरल होतोय भूकंपात हलत्या घराचा व्हिडिओ

नवी दिल्ली: शुक्रवारी मध्यरात्री उत्तर भारतातील पाच राज्यांना 6 रिश्‍टर स्केल तीव्रतेसह भूकंपाचे धक्के बसले. पाच राज्यांमध्ये दिल्ली, जम्मू- काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. भूकंपाची तीव्रता व केंद्रबिंदू याबाबत जास्त माहिती मिळाली नाही. तसेच या भूकंपामध्ये आतापर्यंत कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाल्याची बातमी नाही.

या पाच राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले त्यावरुन भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल पर्यंत होती. या पाच राज्यांसहीत शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील काही प्रांतांमध्ये देखील भूकंपाचे तीव्र झटके शुक्रवारी रात्री जाणवले. शुक्रवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे झटके जनवण्यास सुरुवात झाली होती. तरीही अद्याप भूकंपाचा केंद्रबिंदू कोणता आहे हे स्पष्ट झाले नाही.

सोशल मीडियावरती या भूकंपाचे व्हिडिओ व्हायरल होत असून, काही सोशल मीडियावरती या भूकंपाचे फोटो पहायला मिळत आहेत. जम्मू- कश्मीरमधील एका युवकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका उत्तर भारतातील घराचा व्हिडिओही शेअर केला गेला आहे. तसेच पाकिस्तानमधील भूकंपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही पाहायला मिळाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like