हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्याला जर चांगले आयुष्य जगायचे असेल, तर आपली जीवनशैली चांगली असणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही सकस आणि ताजे अन्न खाल्ले पाहिजे. ज्या अन्नामधून आपल्याला पौष्टिक घटक मिळतात. त्या अन्नाचे आपण दररोज सेवन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीराला आणि त्वचेला देखील फायदा होतो. अशातच आता एका संशोधनाच्या अभ्यासात अशी माहिती समोर आलेली आहे की, जर तुम्ही तर रोज अंड्याचे सेवन केले, तर तुमचे मेंदूचे कार्य देखील चांगले होते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे आपल्या शरीराला या अंड्याचा खूप फायदा होतो. डॉक्टर देखील आपल्याला दररोज आपल्या आहारात एका अंड्याचा समावेश करण्यात सांगतात. अंड्यामध्ये कोणी विटामिन B6, B12, फॉलिक ऍसिड असते. ज्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी अंड्याचे दररोज सेवन करणे खूप फायदेशीर असते.
या अभ्यासामध्ये 55 वर्षावरील 890 जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. यामध्ये 357 पुरुष आणि 553 महिला होत्या. या लोकांच्या मेंदूच्या कार्यावर अंडी खाण्याचा प्रभाव होतो की नाही हे पाहिले गेले. चार वर्षे हा प्रयोग करण्यात आला. त्याचे रिझल्ट देखील चांगले होते. यामध्ये ज्या महिला अधिक अंडी खात होत्या. त्यांचा शब्दांचा योग्य आणि वेगाने उच्चार करण्याची क्षमता चांगली होती. त्याचप्रमाणे महिलांना जनावरेझाडे आणि अन्न वस्तूंची नावे सांगण्याची क्षमता देखील चांगली होती.
पुरुषांवर कमी प्रभाव
परंतु पुरुषांच्या बाबत मात्र अंड्याच्या सेवनाचा जास्त विशेष प्रभाव मेंदूवर झालेला दिसला नाही. तरीही अंड्याच्या सेवन कोणत्याही जेंडरवर वाईट परिणाम करत नाही. हे महत्त्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम होतो. गोष्टी लक्षात राहत नाहीत. यामुळे अंड्याचा फायदा होतो. मेंदूच्या कार्यासोबतच आपल्या शारीरिक आरोग्यासाठी देखील अंडी खूप लाभदायक आहे.
रोज अंडी खाण्याचे फायदे
महिलांच्या हाडांच्या मजबुतीसाठी देखील अंडे खाणे चांगले आहे. अंड्यामध्ये उच्च कोटीचे प्रोटीन असते फॉस्फरस आणि सिलेनियम देखील असते. यामुळे हाडांच्या बळकटीसाठी तसेच इतर आरोग्यासाठी देखील अंड्याचे सेवन करणे गरजेचे आहे.