हिवाळ्यात फिट अन् निरोगी राहण्यासाठी खा ‘हे’ 5 ड्रायफ्रूट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा काळ असून या थंडीच्या दिवसात स्वतःचे आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात ताप, दमा, फ्लू, खोकला यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात सुका मेवा म्हणजे ड्राय फ्रुटचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ड्राय फ्रुट बाबत सांगणार आहोत ज्याचे सेवन केल्याने शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

kaju

1) काजू-

आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये काजू खूप गुणकारी असल्याचे सांगितले जाते. काजूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, ब जीवनसत्त्वे, प्रथिने, चरबी, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील जास्त असतात. काजू शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. काजूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची पातळीही योग्य ठेवता येते याशिवाय मायग्रेनच्या दुखण्यावरही काजू गुणकारी आहे.

almonds

2) बदाम-

बदामामध्ये फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, झिंक, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. यासोबतच बदामाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण आणि हिमोग्लोबिनची पातळीही सुधारते. बदाम खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राहते. याशिवाय फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यास मदत होते.

Pista

3) पिस्ता-

पिस्तामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक आढळतात. पिस्ता हिवाळ्यात शरीराला उबदारपणा प्रदान करते. पिस्त्याचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पिस्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सला बेअसर करून वृद्धत्व रोखतात.

anjeer

4) अंजीर-

अंजीरामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर उपलब्ध असतात. हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने शरीर उबदार राहते. अंजीराच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप चांगले आहे.

walnut

5) अक्रोड-

हिवाळ्यात अक्रोड खाणे खूप उपयुक्त ठरते. हिवाळ्यात अक्रोड खाल्ल्यास ते शरीराला उबदार ठेवते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यात खूप मदत करतात. अक्रोडाचे सेवन त्वचा आणि केसांसाठी देखील खूप चांगले आहे.