हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराला वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. आणि ही पोषक तत्व वेगवेगळ्या पदार्थापासून मिळतात. लहानपणापासूनच आपल्याला दूध दिले जाते. कारण दुधामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी असतात. ज्यामुळे आपली हाडे आणि दात देखील मजबूत होतात. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. परंतु काही लोक असे असतात. ज्यांना दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ म्हणजे दही, चीज, पनीर यांसारखे पदार्थ आवडत नाही.
त्यामुळे त्यांना उलट्या वगैरे होतात. यावरून हे स्पष्ट होत आहे की, त्यांचे शरीर हे लॅक्टोज पचवू शकत नाही. परंतु या गोष्टीचे सेवन न केल्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. आणि काही लोकांना कॅल्शियम सप्लीमेंट घ्यावे लागतात. परंतु जर तुम्ही दूध पीत नसाल आणि तुम्हाला कॅल्शियमची गरज असेल, तर तुम्ही इतर असे अनेक पदार्थ आहे. ज्यामधून तुम्हाला चांगले कॅल्शियम मिळेल. आता हे नक्की कोणते पदार्थ आहेत हे आपण जाणून घेऊया.
क्विनोवा
क्विनोवा मध्ये वेगवेगळे प्रथिने आणि अमिनो ऍसिड असतात. तसेच लॅक्टोज आणि ग्लुटेन ज्या लोकांना पचत नाही त्यांच्यासाठी क्विनोवा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल तर तुम्ही याचे सेवन करू शकता
केळी
केळीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट, फायबर व्हिटॅमिन ई आणि विटामिन सी असते. त्यामुळे केळी हा कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी देखील कमी होते.
चिया सीड्स
चिया सीड्स हे एक सुपर फूड आहे. यामध्ये वेगवेगळी प्रथिने, फायबर, ओमेगा थ्री, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट आणि लोह यांसारख्या गोष्टी असतात. तुम्ही जर 100 ग्रॅम चिया सीड्सचे सेवन केले, तर या बियांमध्ये 630 मिलीग्राम कॅल्शियम असते. दुधापेक्षा पाचपट जास्त कॅल्शियम तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्ही असेच सेवन करू शकता.
नाचणी
नाचणीमध्ये देखील मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. नाचणीच्या एका भाकरीमध्ये जवळपास 450 मिलीग्राम एवढे कॅल्शियम असते. यामुळे तुम्ही नाचणीची रोटी, इडली कुकीज यांसारखे पदार्थ बनवून खाऊ शकता. त्याची चव देखील खूप चांगली लागते आणि तुमच्या शरीराला देखील त्याचा फायदा होतो.
शेवगा
शेवग्यामध्ये देखील खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतात. 150 ग्राम शेवग्याच्या शेंगांमध्ये 650 mg एवढे कॅल्शियम आढळते. या पासून तुम्ही सूप किंवा सांबर देखील करू शकता. जेणेकरून तुमच्या शरीराला कॅल्शियमची पूर्तता होईल.
बदाम
बदाम हे एक सुपर फूड आहे. ज्यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. बदामामध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. तुम्ही ते रात्रभर भिजवून किंवा भाजून देखील खाऊ शकता. याने तुम्हाला खूप चांगला फायदा होतो.