ओट्स बरोबर ‘या’ गोष्टीचे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा असे ऐकले असेल कि जे लोक डाएट करतात ते अगदी काही ठराविक गोष्टींचा समावेश हा आपल्या आहारात करत असतात. वजन कमी करण्यासाठी ओटस हे जास्त प्रमाणात वापरले जातात. हा पदार्थ शरीरासाठी जास्त प्रमाणात पोषक असतो. ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच त्यात पोषणमूल्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे आहारात ओट्सचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. विविध पदार्थांमध्ये ओट्सचा समावेश करु शकतो, ओट्स नुसते खाणे चांगले लागत नाहीत. तर त्याबरोबर ठराविक पदार्थांचा वापर आरोग्यास फायदेशीर ठरते आहे. त्याविषयी…

— पॅनकेक

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पॅनकेक हा प्रकार आवडतो. पॅनकेक बनवताना ओट्सच्या पिठासोबत गव्हाच्या पिठाचा समावेश करा.

— स्मूदी

तुम्हाला ओट्सयुक्त नाश्ता आवडत नसेल तर स्मूदी विथ ओट्स हा उत्तम पर्याय तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे तुम्ही विविध फ्लेवर असलेल्या स्मूदीच्या प्रकारांची चव चाखून बघू शकता.

— कुकीज

कुकीज या गव्हाचं पीठ वापरून बनवल्या जातात, असं माहीत आहे. पण, त्यात तुम्ही ओट्सचं पीठ देखील घालू शकता. यामुळे वेगळा पदार्थ खाण्याची इच्छाही पूर्ण होईल आणि पौष्टिक देखील खाल्लं जाईल.

सूप

अनेक घरांमध्ये जेवणाआधी सूपचा आस्वाद घे विविध प्रकारच्या सूपचा आस्वाद घेतला जातो. त्यात ओट्सचा देखील समावेश करू शकता.लहान मुलांना सुद्धा त्याचा सूप दिला जाऊ शकतो.

— ओट्स मिल्क

गाय किंवा म्हशीचं दूध पचायला जड जाणाऱ्या व्यक्तींना ओट मिल्कचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ओट मिल्कमध्ये जीवनसत्व आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. मुख्य म्हणजे ओट मिल्क हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात मदत करत. त्यामुळे याचा आहारात समावेश केल्यास उत्तम!

चिक्की

— तुम्हाला अधूनमधून गोड पदार्थ खाऊ वाटत असतील तर ओट्स चिक्कीचा पर्याय उत्तम ठरू शकतो.

  • ओट्स पौष्टिक जरी असले तरी रोज नाश्त्याला ओट्स खाणं टाळा. त्याऐवजी पोहे, उपमा, कडधान्य यांचा पर्याय आहे.

  • विविध फ्लेवर असलेले ओट्स खाणं टाळा. त्याऐवजी साधे ओट्स खाण्यास प्राधान्य द्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment