Ebrahim Raisi Death : हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू (Ebrahim Raisi Death) झाला आहे. काल अझरबैजान सीमेवरून जात असताना हे हेलिकॉप्टर कोसळलं होत. अंधार आणि पाऊस सुरू झाल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. मात्र आता त्यांच्या हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागला आहे . मात्र यात त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. इब्राहिम रायसी यांच्या मृत्यूमुळे इराणला मोठा धक्का बसला आहे.

पूर्व अझरबैजान मध्ये क्रॅश झालं होते हेलिकॉप्टर – Ebrahim Raisi Death

इराणचे अध्यक्ष अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. इराणची राजधानी तेहरानपासून 600 किमी अंतरावर असलेल्या पूर्व अझरबैजान प्रांतातील जोल्फाजवळ रविवारी हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं होते. अखेर या अपघातात 63 वर्षीय इब्राहिम रायसी यांचा मृत्यू (Ebrahim Raisi Death) झाल्याचे समोर येत आहे.

इराणचे रेड क्रिसेंटच्या प्रमुखांनी सांगितलं की, रेस्क्यू टीम दुर्घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या ढाच्याजवळ पोहोचली आहे. 20 हून अधिक बचाव पथके राईसी यांचा शोध घेत होती. आम्हाला रेस्क्यू टीमकडून काही व्हिडिओ मिळाले आहेत. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. घटनास्थळावर कोणी जिवंत असल्याचे आढळून आलेले नाही.