आपलं शहर ग्रीनसिटी बनवण्यासाठी करा पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेजण आपल्या बाप्पाला घरी आणायची तयारी करत आहेत. बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी गणपतीच्या मूर्ती विक्रीस आल्या आहे. पण आपण या मूर्ती खरेदी करताना मूर्ती कशापासून बनवली आहे. याचा विचार करून मगच ती मूर्ती खरेदी करायाला हवी. कारण बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती जर आपण खरेदी केल्या तर पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे. तेव्हा आपण कशाप्रकारे पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. मात्र पर्यावरण पूरक उत्सव साजरा व्हावा आणि शहरात वृक्षाची संख्या वाढावी या हेतूनं आपण पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करावी हा त्यामागचा मुख्य आहे. वाशिम शहरातील महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळानी याच हेतूने एक हजार एकशे अकरा रोपट्यापासून दहा फूट उंच गणेश मूर्ती साकारली होती. या आगळ्या वेगळ्या गणेश मूर्ती बघण्यासाठी शहरातील नागरिकांची एकच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे गणेश विसर्जनानंतर हि रोपटी भक्ता ला वाटप करून जगवण्याची शपथ घेतली गेली.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे सरकार सोबतच अनेक सामाजिक संघटना प्रयत्न करीत असून याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र वाशिम येथील महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवित चक्क ११११ रोपट्यापासून गणेश मूर्ती साकारली होती. त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवात आपण सुद्धा अशाच पद्धतीच्या गणपतीची स्थापना केली तर शहर ग्रीन व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.

हे पण वाचा –

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

गणपतीत ‘डीजे’चा आवाज बंदच

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

 

Leave a Comment