देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे पुरवठा आणि मागणी दोन्हींवर परिणाम झाला आहे. आता लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे पुरवठ्यातील समस्या हळूहळू दूर होतील. पण मागणीतील समस्या कायम आहेत, असंही शक्तिकांत दास म्हणाले.

दरम्यान, देशात सध्या एकमेव कृषि क्षेत्रातच तेजी आहे. यावेळी मान्सून चांगला होणार आहे. यामुळे कृषि क्षेत्रात तेजी बघायला मिळेल. याशिवाय इतर क्षेत्रांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जे काही आकडे येत आहेत, ते सर्व निराशाजनक आहेत, असं शक्तिकांत दास म्हणाले. २०१९-२० मध्ये चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी- मार्चचे रिपोर्ट आले आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात विकास दराने (जीडीपी) ११ वर्षांचा ४.२ टक्के इतका निचांक गाठला आहे. यामुळे चौथ्या तिमाहीत विकास दर ३.१ टक्के इतका राहिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment