गोलंदाजांची धुलाई करत ‘या’ फलंदाजाने फक्त 28 चेंडूत झळकावले शतक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये काही फलंदाज आपल्या आक्रमक खेळीने प्रभावित करत असतात. ह्या आक्रमक फलंदाजला प्रतिस्पर्धी संघ नेहमी लवकर बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. क्रिकेटमध्ये वनडे, टी-२० लोकप्रिय झाले आहे. जर टी-२० क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने शतक झळकावले तर ती मोठी गोष्ट असते. आता तर टी-१० स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या टी-१०मध्ये एका फलंदाजाने फक्त २८ चेंडूत शतक झळकावले आहे.

मुसद्दिक अहमद या पाकिस्तानच्या फलंदाजाने युरोपियन क्रिकेट सीरीज टी-१० लीगमध्ये कुमेरफेल्डर स्पोर्टवेरिनकडून खेळताना ३३ चेंडूत ११५ धााव केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने ७ चौकार आणि १३ षटकार लगावले आहेत. अहमदच्या या वादळी खेळीमुळे कुमेरफेल्डर संघाने १० षटकात १९८ धावा केल्या. यानंतर उत्तरा दाखल हॅम्बर्ग संघाला फक्त ५३ धावा करता आल्या आणि स्पोर्टवेरिनने हा सामना १४५ धावांनी जिंकला.

मुसद्दीक अहमद हा युरोपियन क्रिकेट सीरीज टी-१० मध्ये सर्वात वेगाने शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या अगोदर वेगाने शतक झळकावण्याचा विक्रम गोहार मनन याच्या नावावर होता. मनन ने २९ चेंडूत शतक झळकावले होते. अहमदने आतापर्यंत ३१ प्रथम श्रेणी,४१ लिस्ट ए सामने तसेच २५ टी-२० सामने खेळले आहेत. अहमदने टी-२० सामन्यात १५७च्या स्ट्राइक रेटने २९० धावा केल्या आहेत.

Leave a Comment