हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ याना ईडीची नोटीस आली आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. दरम्यान यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
सोमवारीच अडसूळ यांना ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. ईडीच्या हाती त्यांच्याविरोधातील सबळ पुरावे लागल्यास अडसूळ यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.