हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांना ईडीने नोटिस बजावली आहे. आयएल ॲंन्ड एफसी कंपनीप्रकरणात जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. सोमवारी त्यांना चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.
एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज जाहीर होणार असताना दुसरीकडे जयंत पाटील यांना आजच ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. त्याप्रकरणीच जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीवर जयंत पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार?
जाणून घ्या 'या' 5 शक्यता👉🏽 https://t.co/2o7jbnwl4L#Hellomaharashtra #EknathShinde
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 11, 2023
दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि अनिल देशमुख ईडीच्या रडारावर होते, ईडीचा वापर सातत्याने विरोधकांवर केला जात आहे असा आरोप सातत्याने होत आहे. आता आज सत्तासंघर्षाच्या दिवशीच जयंत पाटलांना ईडीची नोटीस येणे, हा योगायोग आहे, की आणखी काही. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.