परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका केली होती. यानंतर राणेंना अटक करण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे यामध्ये त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना आता ईडी कडून अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तसेच त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

भाजपाचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणात परिवहनमंत्री अनिल परब यांचा सहभाग असल्याचे एका व्हिडिओ क्लिप वरून दिसून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपडून अनिल परब यांच्या अटकेसाठी प्रयत्नही केले गेले. दरम्यान त्यांची ईडीकडून चौकशीही करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

यापूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. तर आता ईडीकडून अनिल परब यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटद्वारे यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ईडीच्या नोटीसीनंतर राऊत म्हणाले.. ”शाब्बास!

परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानांतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment