Sunday, May 28, 2023

काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती आहे. दरम्यान राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मात्र ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार दिलेला आहे. यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं स्पष्ट करत सध्या यावर मी बोलणार नसल्याचं विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत स्वप्नाली कदम …?

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत.. तसंच पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत.अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’