‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ED चा छापा; नेमकं प्रकरणं काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सक्तवसुली संचालनालय (ED) च्या वतीने सध्या मनी लाँडरिंग प्रकरणी अनेक नेत्यांवर कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता लाँडरिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर आणि इतर संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. याआधी सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे रोजी याच प्रकरणी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 4 ऑगस्ट 2017 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात सत्येंद्र जैन यांनी हवालाद्वारे 4.81 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. एप्रिलमध्ये, ईडीने जैन आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन यांच्या जवळच्या लोकांचे काही कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. ज्यांची मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत चौकशी सुरू आहे.

 

काय आहे प्रकरण?

आरोग्यमंत्री जैन यांच्या अटकेनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आरोग्यमंत्र्यांना ईडीने खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप केला होता. हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी ते आम आदमी पक्षाचे प्रभारी आहेत आणि भाजपला तेथे निवडणूक हरण्याची भीती असल्याने हे केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. 30 मे रोजी चौकशी केल्यानंतर, जैन यांना मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली.

Leave a Comment