खाद्यतेल झाले स्वस्त, आता कोणत्या दराने तेल मिळणार जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर नवीन वर्षापूर्वी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता खाद्यतेल स्वस्तात मिळणार आहे. खरं तर, अनेक प्रमुख खाद्यतेलाच्या कंपन्यांनी खाद्यतेलाची MRP कमी केली आहे. इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने सोमवारी सांगितले की,”अदानी विल्मर आणि रुची सोया या प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांच्या MRP मध्ये 10-15 टक्क्यांनी कपात केली आहे.”

कोणत्या ब्रँडचे तेल स्वस्त झाले जाणून घ्या
SEA ने म्हटले आहे की,”अदानी विल्मर, रुची सोयाचे महाकोश, सनरिच, रुची गोल्ड आणि नुट्रेला ब्रँड ऑइल, इमामीचे हेल्दी अँड टेस्टी, बंजचे डालडा, गगन, चंबल ब्रँड आणि जेमिनी ब्रँडचे जेमिनी फ्रीडम सनफ्लॉवर या तेलांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.

न्यूट्रिलिव्ह ब्रँडवरील काफ्को, सनी ब्रँडवर फ्रिगोरिफिको एलाना, विटालाइफवर गोकुळ एग्रो, मेहक आणि झैका ब्रँड आणि इतर कंपन्यांनीही खाद्यतेलाच्या किंमतीत कपात केली आहे.

मोहरीचे तेलही स्वस्त होऊ शकेल
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच तेल उद्योगातील प्रमुख कंपन्यांची बैठक बोलावली होती आणि आयात शुल्कात कपात केल्यानंतर सकारात्मक पुढाकार घेण्याची विनंती केली होती. येत्या काही महिन्यांत देशांतर्गत मोहरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन आंतरराष्ट्रीय किंमतीत घसरण होईल, या अपेक्षेने नवीन वर्ष ग्राहकांसाठी आनंदाचा मेसेज घेऊन येईल, असा आशावाद उद्योग संघटनेने व्यक्त केला आहे.

सरकारने उचलले ‘हे’ पाऊल
SEA ने म्हटले आहे की,”गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली वाढ आंतरराष्ट्रीय किमतींमुळे देशांतर्गत ग्राहकांना तसेच धोरणकर्त्यांना त्रास होत आहे. खाद्यतेलाच्या किंमतींना आवर घालण्यासाठी सरकारने यावर्षी अनेकवेळा रिफाइंड आणि क्रूड खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे.”

आयात शुल्कातील शेवटची कपात सरकारने 20 डिसेंबर रोजी केली होती जेव्हा रिफाइंड पाम तेलावरील बेसिक कस्टम ड्युटी मार्च 2022 अखेरपर्यंत 17.5 टक्क्यांवरून 12.5 टक्क्यांवर आणली होती.

पुरवठा वाढवण्यासाठी, सरकारने व्यापार्‍यांना डिसेंबर 2022 पर्यंत लायसन्सशिवाय रिफाइंड पाम तेल आयात करण्याची परवानगी दिली आहे आणि बाजार नियामकाने क्रूड पाम तेल आणि इतर काही कृषी वस्तूंसाठी नवीन फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट ऑफर करण्याचा निर्णय घेतला आहे. SEA च्या मते, भारतातील खाद्यतेलाचा वापर 2.2- 2.25 कोटी टन आहे, त्यापैकी सुमारे 65 टक्के तेल आयात केले जाते. मागणी आणि देशांतर्गत पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी देश 131.5 कोटी टन खाद्यतेलाची आयात करतो.

Leave a Comment