Edible Oil | दिवाळीला अगदी दोन-तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे. दिवाळी हा आपल्या भारतातील एक सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अगदी सामान्य लोकांपासून केली श्रीमंत लोकांपर्यंत सगळेच दिवाळीचा सण साजरा करत असतात. या सणासुदीच्या काळातघरात वेगवेगळ्या गोष्टींची गरज लागते. अनेक नवीन पदार्थ देखील केले जातात. परंतु अशातच या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. कारण खाद्य तेलाच्या (Edible Oil) दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा दुकानांमध्ये दिवाळीचा फराळ तयार केला जातो. त्यांनी देखील त्यांच्या मिठाईच्या आणि फराळाच्या किमती वाढवलेल्या आहेत. तसेच मोहरीच्या तेलाच्या किमतीत देखील 29 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
सप्टेंबर महिन्यापासूनच भाज्या आणि खाद्य तेलाच्या (Edible Oil) किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भाज्या आणि खाद्य तेलाच्या किरकोळ महागाई दर 5% हा 9 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचलेला आहे. मागील महिन्यात सरकारने क्रूड सोयाबीन पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे हे भाव वाढले होते. तसेच 14 सप्टेंबर पासून क्रूड पाम सोयाबीन आणि सोयाबीन सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क हे 5.5 टक्क्यावरून 27.5% एवढी करण्यात आलेले होते.
मागील महिन्यामध्ये क्रूडपाम सोयाबीन आणि सूर्यफल तेलाच्या जागतिक किमती या 10.6% आणि 16.8% एवढ्या होत्याम परंतु त्या आता 12.3 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. भारत जवळपास 58% खाद्यतेल हे आयात करत करतो.