Edible Oil Price | सर्वसामान्य नागरिकांना बसणार आर्थिक फटका; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Edible Oil Price | महाराष्ट्रात नुकतेच गणपती साजरे झालेले आहे. आणि आता एकानंतर एक असे अनेक सण येणार आहेत. गणपतीनंतर आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येतील. परंतु या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला जरा जास्त फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. कारण आता खाद्य तेलाच्या (Edible Oil Price) किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात जर आपण पाहिले तर सोयाबीन तेलाची किंमत ही 110 रुपये किलो होती. परंतु ती आता 125 रुपयांवर गेलेली आहे. तसेच सोयाबीनच्या तेलात पुन्हा एकदा दर वाढ होऊन ते 133 रुपयांवर पोहोचलेले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक चिंतेची बाब बनलेली आहे.

केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवलेली आहे. त्यामुळे ही दरवाढ देखील मोठ्या प्रमाणात झालेले दिसत आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कावर 20 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफेल ते 27.5 टक्के आयात शिल्क लागणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहेत. आणि या खाद्यतेलाची किंमत 20 ते 25 रुपयांनी देखील वाढलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन तेलाचे भाव हे 125 रुपये पर्यंत होते. परंतु ते पुन्हा एकदा पाच रुपयांनी वाढलेले आहे. आणि सोयाबीन तेलाचे दर आता 135 रुपयांवर पोहोचलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा एक मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नागरिक हे अगदी काटकसरीने किराणा विकत घेत असतात. त्यातही तेलाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करतात. साधारणपणे महिन्याला चार ते पाच लिटर तेल लागते. परंतु आता तेलाचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.

दरवर्षी सणासुदीच्या काळात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असते. परंतु यावर्षी खाद्यतेल महाग होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाणार आहे. खाद्यतेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यांनी किरकोळ किमतीमध्ये वाढ न करण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे सध्याचा साठा शिल्लक असेपर्यंत खातेगोलाच्या किमती वाढू नये, अशी सूचना केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना दिलेली आहे.