Thursday, February 2, 2023

Palm Oil Price : खाद्य तेलाच्या किंमतीत मोठा बदल; यंदाची दिवाळी गोड होणार?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज खाद्यतेलाच्या (Oil) घाऊक दरात वाढ झाली आहे. दिवाळीचा सण जवळ आल्याने तेलाच्या (Oil) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, परदेशातील बाजारातील मजबूत कल आणि वाढती मागणी यामुळे या किमती वाढल्या आहेत.

या गोष्टींमुळे होतो परिणाम?
मलेशियाचे शेअर मार्केट काल तीन टक्क्यांनी वधारले. तसेच शिकागो एक्सचेंज देखील काल रात्री दोन टक्क्यांनी वाढले होते. यामुळे सरकारने मंगळवारी चालू पीक विपणन वर्षासाठी मोहरी आणि सूर्यफुलाच्या किमान समर्थन मूल्यात (एमएसपी) 400 रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता मोहरीचा भाव 5,450 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच जोपर्यंत सरकार सूर्यफूल तेलाच्या (Oil) आयातीवरील 2 दशलक्ष टन कोटा मर्यादा हटवत नाही, तोपर्यंत या तेलाचा पुरवठा कमी राहील आणि त्याच्या किमती वाढतच राहतील. यामुळे सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना प्रतिलिटर 20 ते 30 रुपये अधिक मोजावे लागणार आहे.

आताचा चालू भाव
सध्या तेलाला (Oil) बाजारात मोहरी तेलबिया आज 7000 रुपये प्रति क्विंटल, भुईमूग 7210 रुपये प्रति क्विंटल, तर पामोलिन आरबीडी 10200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!