Agri Gold Ponzi Scam प्रोमोटर्स विरोधात ईडीची कारवाई, 32 लाख लोकांची केली फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अन्वेषण यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने ( Enforcement Directorate ) 6,380 कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने अ‍ॅग्री गोल्ड पोंझी कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली आहे. ज्यांना कोर्टाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा , कर्नाटक, छत्तीसगड , ओडिशा, महाराष्ट्र , तमिळनाडू सह सुमारे 9 राज्यांमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे ही कारवाई केली आहे.

32 लाख लोकांची फसवणूक
या घोटाळ्यात आरोपींनी 32,02,628 पेक्षा जास्त ( investor accounts) फसवणूक केली आहे. ज्यामध्ये आरोपींनी 6,380 कोटींहून अधिक चिट फंडाची रक्कम लंपास केली आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांतील पीडितांनी आरोपींवर अनेक गुन्हे दाखल केले होते. ज्यामध्ये ईडीने कारवाई करत कंपनीच्या तीन प्रोमोटर्सना अटक केली. या घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या आरोपींच्या यादीमध्ये अ‍ॅग्री गोल्ड ग्रुप कंपन्यांचे प्रमुख प्रोमोटर अग्वा व्यंकट रामा राव यांच्यासह आणखी बरेच आरोपी आहेत. त्याचबरोबर ईडीनुसार अ‍ॅग्रो गोल्ड ग्रुपचे प्रोमोटर अव्वा वेंकट रामा राव यांचे नाव आधीच पोंझी योजनेत आले आहे.

https://t.co/OEFg4qv4br?amp=1

आरोपींनी 150 हून अधिक शेल कंपन्या बनवल्या
अ‍ॅग्री गोल्ड पोंझी घोटाळा (Agri Gold Ponzi Scam ) प्रकरणी अंमलबजावणी होण्यापूर्वी 150 हून अधिक शेल कंपन्या तयार केल्या आणि त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला. ईडीच्या मते, हा कट रचल्याबद्दल अ‍ॅग्री गोल्ड ग्रुपच्या अव्वा व्यंकट रामा राव यांच्या कुटुंबातील अनेकांच्या भूमिकेबद्दल संशय आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या तपासणीत या घोटाळ्यामध्ये सात भावांची नावे अडकल्याचे दिसून आले आहे.

https://t.co/u35WG1SpIO?amp=1

हा घोटाळा कसा केला
अ‍ॅग्री गोल्ड ग्रुपच्या कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी नियोजित कटात (planned conspiracy ) चिटफंड स्कीम ( tricks of the trade in that scheme ) सुरू केल्या. ज्या अंतर्गत असे आश्वासन देण्यात आले होते की, या योजनेंतर्गत जे लोकं पैसे गुंतवतील त्यांना गुंतविलेल्या पैशाच्या बदल्यात विकसित केलेल्या शेतजमिनी अगदी वाजवी दराने ते उपलब्ध करुन दिल्या जातील. जर एखाद्या गुंतवणूकदाराला जमीन नको असेल तर मग त्या गुंतवणूकीच्या बदल्यात त्यांना अत्यल्प व आकर्षक दरावर व्याजासह त्यांचे मूळ पैसे परत केले जातील. ही चिट फंड योजना देशातील बर्‍याच राज्यात एकाच वेळी पसरविण्यात आली. ज्याच्या जाळ्यात लोकं अडकतच गेले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या चिट फंड घोटाळ्याअंतर्गत 32 लाख लोकांना या गटामध्ये जोडले गेले आणि त्यांच्याकडून गुंतवणूक केली गेली. ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. ज्यामध्ये लवकरच आणखी बऱ्याच जणांवर कारवाई केली जाईल.

https://t.co/YqnnKLtL8z?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment