हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने समन्स बजावले आहेत. अवैध उत्खनन प्रकरणात हेमंत सोरेन यांना ईडीने हे समन्स पाठवलं आहे. गुरुवारी त्यांना गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
हेमंत सोरेन यांच्यावर अवैध खाण उत्खनन प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांच्या साहेबगंज येथील निवासस्थानी छापा टाकताना ईडीला एक लिफाफा सापडला होता. त्यात मुख्यमंत्र्यांच्या बँक खात्याशी जोडलेले चेकबुक असल्याचे सांगण्यात येत आहे. 2 चेकबुकवर मुख्यमंत्र्यांची सही मिळाल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या ईडी समन्स नंतर जेएमएमचे नेते मनोज पांडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे सूडाचे राजकारण आहे. आमच्यावर अन्याय झाला तर कोर्टात जाऊ. मुख्यमंत्र्यांना ईडी बोलावू शकते की नाही माहीत नाही? तसे असल्यास कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री उत्तर देतील. असेही ते म्हणाले.