10 वी, 12 वी च्या परिक्षांसदर्भात शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. या परीक्षेबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे. “दहावी व बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांची परीक्षा दि. 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 आणि 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत पार पडतील. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची घोषणा मंत्री गायकवाड यांनी आज केली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दहावी आणि बारावी परीक्षा संदर्भात माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, इ. 12 वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. 10 वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment