Sunday, April 2, 2023

राज्यातील शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महत्वाची माहिती दिली. शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार असून उर्वरित वर्ग लवकरच सुरू केले जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली.

एक वर्षांपूर्वी मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठवण्याचा निर्णय सुराज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. त्यापासून राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. आता कोरोना रुग्ण संख्या कमी झाला असल्याने लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

या संदर्भात शिक्षणमंत्री गायकवाड यांनी आज महत्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत ज्या राज्यात कोरोना कमी झाला आहे. त्या ठिकाणची माहिती घेत तेथील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून पुढील आठवड्यात बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान सुरु करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांबरोबर शाळाही सुरु होणार असल्याने विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.