शाळेच्या ‘फी’मध्ये वाढ केल्यास कडक कारवाई; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे शाळांनी जादा फी आकारू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशातचं आता शाळा सुरू झाल्यावर मुलांची फी कशी भरायची असा प्रश्न सर्वसामान्य पालकांच्या समोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना दिलासा देणारा निर्णय वर्षा गायकवाड यांनी हा घेतला आहे. खासगी शाळांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ”की ज्या खाजगी शाळा पालकांकडून ज्यादा शुल्क आकारतील अशा शाळांवरती कार्यवाही करू. त्याचबरोबर दरवर्षी शैक्षणिक वर्ष १५ जूनला होतं. याही वर्षी १५ जूनलाच शाळा सुरू करण्याचा मानस आहे. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता यावर पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खासगी शाळांनी शुल्क वाढवू नये, पालकांना सोयीचे पडेल तशा पद्धतीने टप्प्यांमध्ये शाळांनी पालकाकडून शुल्क घ्यावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. कारण यावर्षी कोरोनामुळे पालकांची परिस्थिती नाजूक असल्याने शाळांनी हा निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक शाळांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करुन नये, असे निर्देश दिले आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment