शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे; पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मनपाला आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सरदार वल्लभभाई पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. याविषयी आयुक्तांना सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार शहरात २० एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला औरंगाबाद मनपाद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र यासंदर्भात एमजेपीकडे विचारणा केली असता आत्तापर्यंत याबाबत कुठलेही काम सुरु करण्यात आलेले नाही.

राष्ट्रीय महामार्गाकडून लागणारी परवानगीही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याच गतीने काम सुरु राहिल्यास डिसेंबरपर्यंत पाणी मिळणार कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र ही योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी साधारणपणे १५ ते २० एमएलडी पाणी वाढवण्याचे नियोजन केले जात आहे.

देसाई यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेऊन येत्या सहा महिन्यापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाने एकत्रित प्रयत्नातून शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठीचे प्रयत्न करावे. अशा सूचना केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता यांना विचारणा केली असता, पैठण ते औरंगाबाद पर्यंत ५ ते १० किमी अंतर्गत जलवाहिनी टाकून क्रॉस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यासाठी लागणारी परवानगी अजून काढण्यात आलेली नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सहा महिन्यांमध्ये २० एमएलडी पाणी वाढण्याची शक्यता कमीच आहे

Leave a Comment