टीम, HELLO महाराष्ट्र । रिबिन्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य प्रथम पाहुयात ,
साहित्य : १ कप तांदळाचे पीठ, पाव कप बेसन (हरभरा डाळीचे पीठ), पाव कप कांद्याची पात बारीक चिरलेली, पाव कप हिरवे मटार (मटार दाण्यांचे मधून दोन भाग करा किंवा थोडेसे कुटून घ्या), पाव कप बारीक चिरलेला कांदा, २ टेबलस्पून बारीक चिरलेले गाजर, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून बारीक कुटलेली हिरवी मिरची, १ अंडे, १ टीस्पून हळद, २ टीस्पून धणे पूड, २ टीस्पून जिरे पूड, चवीनुसार मीठ, चीज, टोमॅटो सॉस, तेल
कृती : चीज, टोमॅटो सॉस आणि तेल सोडून इतर सगळे साहित्य एकत्र करून घ्या. त्यात अंडे फोडून व गरजेपुरते पाणी घालून सैलसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण २ मिनिटं चांगले फेटून घ्या.
तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून मिश्रण पसरवून घ्या. त्याच्या सर्व बाजूनी अगदी थोडे तेल सोडा. झाकण ठेवा. दुसरी बाजू सुद्धा नीट भाजून घ्या.
या प्रमाणात मध्यम आकाराची ५ धिरडी तयार होतील. तयार धिरडी मधून दुमडून कात्रीने किंवा कटरने कापा. त्याच्या लांब आणि बारीक रिबिन्स तयार होतील अशा पद्धतीने सगळी धिरडी कापून घ्या.
वाढताना त्यावर थोडीशी कोथिंबीर, थोडं किसलेलं चीज आणि टोमॅटो सॉस घाला.
एरवी धिरडे, थालिपीठं, पराठे यासारखे पदार्थ खाण्यासाठी कंटाळा करणारी मुलं ह्या पौष्टिक रिबिन्स पटापट फस्त करतात.