मराठवाड्यातील आठ धरणे शंभर टक्के भरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी
येलदरी 791.99, सिद्धेश्‍वर 80.96, मानार 138.21, विष्णुपुरी 80.79, निम्न दुधना 242.20, माजलगाव 307.20, मांजरा 176.96, पेनगंगा 962.18, निम्न तेरणात 91.22, सीना कोळेगाव 89.35.

दृष्टिक्षेपात धरणातील साठा, धरणाचे नाव टक्केवारी विसर्ग सुरू (क्युसेक) –
जायकवाडी 99.3437728
निम्न दुधना 100 00
येलदरी 97.892953
सिद्धेश्‍वर 100 113586
माजलगाव 98.46 21972
मांजरा 100 5242
पेनगंगा 99.80 27122
मानार 100 1747
निम्न तेरणा 100 3835
विष्णुपुरी 100 249498
सीना कोळेगाव 100 8335

Leave a Comment