एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात; गाडीचा टायर अचानक फुटल्याने घडली घटना

जळगाव प्रतिनिधी | एकनाथ खडसे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर येथून जळगावकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातानंतर एकनाथ खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं, “आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधानाने तसेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.”

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते. अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच १९ सीई १९) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

You might also like