बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? खडसेंचा शहाजी पाटलांना खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील हे सतत आपल्या विधानांनी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पूर्वीच्या हलाखीच्या परिस्थिती बाबत भाष्य करताना आपण आपल्या बायकोला लुगडं सुद्धा घेऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त केली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू यांना टोला लगावत बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? अस म्हंटल आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगितली तेव्हा त्यांनी म्हंटल की त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. शहाजीबापूंनी हे वक्तव्य कदाचित गमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? असा खोचक सवाल करत शहाजी बापूंनी जे म्हटलं आहे, हे कोणत्या हेतूने म्हटलं हे मला माहिती नाही मात्र शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेनं बघण्याची आवश्यकता नाही असं खडसे म्हणाले.

शहाजीबापू नेमकं काय म्हणाले होते –

१९ वर्ष सातत्याने माझ्या घरात गरीबी होती. मी माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील घेऊ शकलो नाही परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते.