एकनाथ खडसेंची भाजपावर यथेच्छ टीका; गोपीनाथ मुंडेंचा भाजप राहिला नसल्याची व्यक्त केली खंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । ज्याला मोठं केलं त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त परळीमधील गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे बोलत होते.

या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री प्रकाश मेहता, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, रासपचे अध्यक्ष महादेव जाणकार, पाशा पटेल तसेच भाजप सह इतर पक्षांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात भाजपमधील नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. लोणीकर, जाणकर यांनी देखील भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले भाजप हा शेठजी आणि भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. परंतु दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी हि ओळख बदलून बहुजनांचा पक्ष अशी केली. पक्षाची एवढी मोठी बांधणी करणाऱ्या मुंडे साहेबाना देखील पक्षात कायम संघर्ष करावा लागला. तीच वेळ माझ्यावर आली आहे. त्यामुळे मी ज्यांच्या बोटाला धरून वर आलो तो आधारवड माझ्या आयुष्यात नसल्याची कल्पनाही करवत नाही अशा शब्दात खडसेंनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच पंकजाचा परळीमधून पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही. परंतु माझा काही भरवसा धरू नका असे सांगत खडसेंनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे.

Leave a Comment