लाडक्या बहि‍णींना मिळणार 2100 तसेच वीजबिलातही सूट; महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपयेची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ,यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये हि मोठी घोषणा करण्यात आली . महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात कपात, 25 लाख रोजगार निर्मिती अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.” केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन असलेला जाहीरनामा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या 10 महत्त्वाच्या घोषणा

लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. 15000 वरून ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांचा पोलिस दलात समावेश करणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये मिळणार आहेत. तसेच एमपीएस वर 20 टक्के अनुदान देण्यात येते देखील सांगण्यात आलेले आहे.

प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि निवारा देण्याचे आणि गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.

वृद्ध पेन्शनधारकांना आता दर महिन्याला 2100 रुपये देणार आहेत. सुरुवातीला ही रक्कम 1500 रुपये एवढी होती.

तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार आहे. असे देखील सांगण्यात आलेले आहे.

25 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच प्रशिक्षणातून दर महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्या वेतन देखील देण्यात येणार आहे.

45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणार आहेत. असे देखील सांगण्यात आलेले आहेत.

अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15000 रुपये वेतन आणि संरक्षण देण्याचे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे वीज बिलामध्ये 30 टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर व्हिजन महाराष्ट्र 2029 100 दिवसाच्या आत सादर करणार आहे.

महायुती सरकारने राज्यात विविध योजना आणल्या असून अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे नेले आहेत. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, अमरावती येथे टेक्सटाईल पार्क, महापे येथे सेमीकंडक्टर संदर्भातील प्रकल्प, विदर्भात सुरजागड येथील प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मिती करणारे कंपनीची स्थापना आणि त्या संदर्भातील करार, विविध नदी जोड प्रकल्पांना मान्यता आणि गती, मोफत कृषी वीज, वाढवण बंदराला मान्यता, रखडलेल्या प्रकल्पांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता, राज्यभरात जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या उभारणीला गती अशी अनेक कामे महायुती सरकारच्या काळात होत आहेत आणि झाली आहेत. त्यामुळेच “केलंय काम भारी, आता पुढची तयारी” अशी टॅग लाईन या जाहीरनाम्याला देण्यात आली असून “विकासनीती म्हणजे महायुती” अशी जोड देखील देण्यात आली आहे.