भाजप पैसे देऊन नगरसेवक फोडतंय; शिंदेंच्या तक्रारीने खळबळ

eknath shinde fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे सत्तेतील एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. भाजप शिंदे गटातील अनेक नेत्याना स्वतःच्या पक्षात प्रवेश देत असल्याने शिंदेची शिवसेना चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचं आणि महाराष्ट्र भाजपची तक्रार केली असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी शिंदेनी ना देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांची तक्रार केली, तर त्याची भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारीचा पाढा अमित शहा यांच्यापुढे वाचल्याचं बोललं जातेय.

शिंदेंची तक्रार काय?

कल्याण डोंबिवलीतील ‘ऑपरेशन लोटस’वरुन अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र ते शिवसेनेचे नगरसेवक फोडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला पोषक वातावरण असताना भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याचे शिंदे यांनी शहा याना सांगितलं. भाजप नेत्यांमुळेच महायुतीत उगाचच बिघाडी होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितल्याचे समजते. तसेच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

अमित शाह काय म्हणाले?

दरम्यान, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या सर्व तक्रारी जाणून घेतल्या. जवळपास ५० मिनिटे शिंदे आणि शाह यांच्यात बोलणं झालं. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, या संपूर्ण घडामोडींकडे माझं लक्ष आहे असं अमित शाह एकनाथ शिंदे याना म्हणाल्याचे बोललं जातंय. यानंतर मित्र पक्षातील संभाव्य पक्ष प्रवेश थांबवा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे