Eknath Shinde : मुंबईतील मुस्लिमबहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपच्या सर्व्हेत मोठी माहिती

Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Eknath Shinde। हिंदुत्वासाठी आम्ही महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत सत्तेत गेलो असं विधान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली केलं होतं. मात्र आता भाजपच्याच एका सर्व्हेत अशी माहिती समोर आली आहे कि मुंबईतील ७० टक्के मुस्लिमबहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती मिळत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपच्या ऐवजी या भागात एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळू शकते असं बोलले जात आहे,. एकीकडे भाजप प्रखर हिंदुत्वाचा प्रचार करत असताना अशावेळी मुस्लिमबहुल भागात महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी भाजप एकनाथ शिंदेंना फ्री हॅन्ड देऊ शकते.

काय सांगतो भाजपचा सर्वे ?

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर आली आहे. राज्यात आणि केंद्रात एकहाती वर्चस्व असताना आता मुंबई महापालिका या देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपकडून मायक्रो प्लॅनिंग सुरु आहे. ठिकठिकाणी सर्वे करून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललाय. भाजपसमोर मुंबई सर्वात मोठी अडचण ठरू शकतो तो म्हणजे मुस्लिम मतदार, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हाच मुस्लिम मतदार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला होता. अशावेळी भाजपने मुस्लिम बहुल भागात सर्व्ह करून नेमका अंदाज घेतला असल्याचं बोललं जातंय.

मुस्लिमबहुल भागात भाजपपेक्षा शिंदेंचा करिष्मा – Eknath Shinde

भाजपाच्या या सर्व्हेत मुंबईतील 18 वॉर्डमध्ये 70 टक्के मुस्लिम बहुल भागात भाजपला विरोध होत असला तरी एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे दिसून आले. या 18 वॉर्डात भाजप उमेदवारापेक्षा शिंदे गटाच्या नेत्यांना तिकीट दिले तर महायुतीला जास्त फायदा होईल. कारण एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा मुस्लिम महिलांनाही मिळत असल्याने शिंदेंबद्दल महिलांच्या मनात चांगल्या भावना आहेत. त्यामुळे या मुस्लिमबहुल भागात शिंदेंचा प्रभाव भाजपपेक्षा जास्त दिसतोय. Eknath Shinde

दरम्यान, या सर्व्हेबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं कि, सध्या जागांबाबत काही चर्चा नाही. आम्ही ज्या योजना आणल्या त्यात कुठेही भेदभाव केला नाही. सर्वसमावेशक अशा योजना आम्ही राबवल्या. विकास करतानाही काही फरक केला नाही. लोकाभिमुख कल्याणकारी लाडकी बहीण योजना आणतानाही आम्ही कुठेही भेदभाव केला नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.