हॅलो महाराष्ट्र| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत बिघाडणा झाल्यामुळे त्यांची नुकतीच डेंग्यू आणि मलेरीयाची टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टनंतर त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले होते. तेव्हा तिथे त्यांना ताप आला होता. गावी उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतले. परंतु त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची नुकतीच डेंग्यू आणि मलेरीयाची टेस्ट करण्यात आली. या टेस्टमधूनच शिंदे यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचे समोर आले आहे.
महत्वाचे म्हणजे, या टेस्टनंतर त्यांचा हेल्थ रिपोर्ट (Health Report) समोर आला आहे. यामध्ये त्यांचा डेंगू-मलेरियाची टेस्ट केल्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे म्हणले आहे. मात्र त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. यामुळेच आता डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तापामुळे शिंदेंना अशक्तपणा आल्यामुळे त्यांना बेडरेस्ट सांगितली आहे. यामुळेच आता एकनाथ शिंदे महायुतीच्या होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहतील की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.