हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde In Satara) हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आहेत. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे शेतात रमले असून त्यांनी आपल्या शेतीतील विडिओ सुद्धा शेअर केला आहे. मात्र या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा असं म्हणत ठाकरेंच्या परदेशवारीवर शिंदेनी निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेनी काय म्हंटल?
परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारीवसे जिथे विठूरायाची पंढरी…
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच यावेळी त्यांनी साताऱ्यातील आपल्या शेतीतील मनमोहक दृश्ये व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली.
परदेशी कशाला जायाचं
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2024
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला… pic.twitter.com/hD5NY0vYey
ठाकरेंना टोला –
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेचे हे ट्विट म्हणजे उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोमणा असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदेनी ठाकरेंच्या परदेशवारीवरून ठाकरेंना टोला लगावला होता. आपल्याला परदेशात जाण्याची गरज नाही कारण माझ्यासमोर भरपूर कामे आहेत असं मागील आठवड्यातच शिंदेनी म्हंटल होत.