कराडातील नवीन शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन, नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार आदी उपस्थित होते.

नवीन शासकीय विश्रामगृहात काय आहेत सुविधा?

नवीन शासकीय विश्रामगृहासाठी २० कोटी २२ लाख ३४ हजार रुपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी १५ कोटी ७५ लाख ५२ हजार रुपयांची कामे स्थापत्य स्वरूपाची असून उर्वरित कामे विद्युतीकरण v फर्निचरची आहेत. एकूण ४ मजल्यांच्या या इमारतीमध्ये ३ व्हीव्हीआयपी कक्ष, १ पी. ए. कक्ष व ४ अधिकारी कक्ष आहेत. प्रत्येक व्हीव्हीआयपी कक्षामध्ये वेटींग रुम, बैठक खोली, जेवण खोली व शयनगृह यांचा समावेश आहे.

प्रशासकीय इमारत कशी आहे?

कराड येथे ५ मजली भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आलेली आहे. १७ कोटी २ लाख ५० हजार रुपये असा या इमारतीचा बांधकाम खर्च आहे. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ७,५७३ चौ.मी. इतके आहे. भूमिगत मजल्यावर वाहनतळ असून प्रत्येक मजल्यावर स्वच्छता गृहाचीही सोय करण्यात आली आहे. तसेच या इमारतीमध्ये प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, कृषी, उपनिबंधक, नगरभूमापन, उपकोषागर, सेतू ही कार्यालये असणार आहेत.