सरकार अडचणीत?? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; पवारांनी बोलावली तातडीची बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची शक्यता आहे. गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे नॉट रीचेबल असल्याची कुणकुण लागताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशिरा शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती .

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संपूर्ण प्रकारणानंतर बैठक बोलावली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पवार पुन्हा एकदा आपला पावर गेम दाखवणार का हे पाहावे लागेल.

Leave a Comment