हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार नेहमी महिलांच्या अन जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना व सेवा पुरवत असते. अशाच योजनेमधील महत्वाची सेवा म्हणजे बस तिकिटात मिळणारी सवलत. पण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका विधानामुळे हि सेवा लवकरच बंद होणार कि काय असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. पण यावर उपमुखमंत्री यांनी महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना दिलासा देणारे स्पष्टीकरण दिले आहे.
महिलांना दिली जाणारी सेवा बंद होणार?
सरनाईक धाराशिव दौऱ्यावर असताना त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा माध्यमांनी त्यांना महिलांना दिली जाणारी 50% सवलत आणि जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या बस सवलतींवर प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले कि ,या सवलतींमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा होऊ लागला आहे. त्याचसोबत, भविष्यात एसटी महामंडळात कोणत्याही नवीन सवलतींचा विचार न करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महिलांना दिली जाणारी सेवा बंद होणार कि काय यावर अनके प्रश्न निर्माण झालेत.
उपमुख्यमंत्रीकडून दिलासा देणारे विधान –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला पूर्णविराम देताना स्पष्ट केले आहे की, महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवासात दिली जाणारी सवलत बंद केली जाणार नाही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एसटी बसच्या प्रवासात महिलांना 50% सवलत आणि जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत कायम राहील. सरनाईक यांनी आपल्या विधानात सांगितले होते की, एसटी महामंडळाला 3 कोटी रुपये रोज तोटा होतो, ज्यामध्ये सवलतींचा प्रभाव दिसून येतो. पण , शिंदे यांनी यावर ठामपणे स्पष्ट केले की, या सवलती कायम राहतील, आणि ते एसटीच्या प्रवासाची परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत.