एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे, असे त्यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

मंत्री शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती. दरम्यान काल खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांच्याकडून विविध कार्यक्रम रद्द केले जात आहेत. तसेच राज्य सरकारकडून ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले जात आहेत.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण –

आतापर्यंत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment