ही आहे आमदारांची भावना…; एकनाथ शिंदेंकडून शिरसाट यांचे पत्र ट्वीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून बंड करत शिवसेनेला हादरा देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील एका पाठोपाठ एक आमदार शिंदे गटाकडे रवाना होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्वीट केले आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना शिंदे यांनी आमदारांची भावना सांगितली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ट्विट केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, आमदार संजय शिरसाट यांनी एक पॉटर लिहले आहार. त्यातून त्यांनी मुख्यमंत्री तुम्ही आमदारांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. एवढंच नाहीतर, सरकारची अडीच वर्ष आमच्यासाठी वर्षाची दारं बंद होती. अनेकदा तासन् तास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली.

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती.

हेच चाणक्य कारकून बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. वटव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो, असे पत्रात म्हंटले आहे.

Leave a Comment