BREAKING : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी विराजमान होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर फडणवीस व शिंदे यांनी एकत्रीतपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा फडणवीस यांनी केली. आपण सत्तेबाहेर राहून शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देऊ असाही फडणवीस यांनी सांगितले.

BREAKING : एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा | Eknath Shinde | Shivsena

देवेंद्र फडणवीस यांना आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, जनतेने आपली मते हि महाविकास आघाडी सरकारला दिले नव्हते तर भाजप आणि शिवसेनेला दिले होते.

भाजपला सत्तेबाहेर ठेवणे हा जनमताचा अपमान होता. २०१९ रोजी भाजप शिवसेना हि युती आम्हाला अपेक्षितच होती. मात्र, तसे झाले नाही. वास्तविक महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हिंदुत्व, सावरकरांचा अपमान झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवला. हा जनमताचा अपमान होता. जनतेनं मतं महाविकास आघाडीला दिलं नव्हतं. ते युतीला दिलं होतं. जनमताचा अपमान करुन महाविकास आघाडी जन्माला आली, असे फडणवीस यांनी म्हंटले.

राजभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचेच अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी निर्णय करू शकणारी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आज राजभवनात फक्त एकनाथ शिंदे हेच शपथ घेतील. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले जाणार असले तरी देवेंद्र फडणवीस या सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून वेगळा संसार मांडायचा ठरवले तेव्हा शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. भाजपसोबत जाऊन एकनाथ शिंदे फार तर उपमुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचले, असा सूर सातत्याने शिवसेनेकडून लावला जात होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना देऊन शिवसेनेच्या या टीकेतील सर्व हवाच काढून घेतली आहे.

Leave a Comment