मुंबईतील प्रसिद्ध मरिन ड्राइव्ह प्रकल्प ठप्प; यामागचं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण म्हणजे मरिन ड्राइव्ह. गेल्या काही वर्षणापासून मुंबईतील प्रसिद्ध मरिन ड्राइव्ह परिसराच्या सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला महापालिकेने सुरुवात केली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकल्पात आवड दाखवली होती , पण आता हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे , हा प्रकल्प अजून पूर्ण न होण्यामागे अन आता तो का थांबवण्यात आला आहे , हे आज आपण पाहणार आहोत.

स्थानिकांचा विरोध आणि निधीची कमतरता –

मरिन ड्राइव्ह सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने दीड वर्षांपूर्वी प्रकल्पाला आरंभ केला होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सोयी-सुविधा, व्ह्युविंग डेक, सी-फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा, आणि लेझर शो यांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात बैठका घेतल्या आणि निर्देश दिले होते, पण आता स्थानिकांचा विरोध आणि निधीची कमतरता यामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे.

सर्व योजनांचा पाठपुरावा थांबला –

मार्च 2023 मध्ये या प्रकल्पाला सुरूवात झाली होती आणि डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट होते. यासाठी महापालिकेने मरिन ड्राइव्ह परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक आराखडा तयार केला होता. पण , त्यानंतर कामात काहीच प्रगती झालेली नाही. ‘एनसीपीए’समोरच्या कामाला महापालिकेच्या ए वॉर्डकडून सुरुवात करण्यात आली होती, तर बाकी राहिलेलं काम हेरिटेज विभागाकडून केले जाणार होते. तसेच त्यावेळी ज. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या मदतीने इमारतींना विशिष्ट रंग देण्याचा निर्णय घेतला होता. याचसोबत समुद्रावर लेझर शो चालवण्याच्या संभाव्यतेची चाचणी देखील करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी त्यावेळी 47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, पण वर्तमान परिस्थितीत या सर्व योजनांचा पाठपुरावा थांबला आहे.