धक्कादायक ! ‘या’ शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मूर्तिजापूर : वृत्तसंस्था – मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो पुंडलिक नगर परिसरातील खंडूजीनाना नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या चव्हाण कुटूंबातील घरगुती वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने लहान भावाची कोयत्याने वार करून हत्या (Murder) केली आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास हि घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सिरसो येथील खंडूजीनाना नगरात राहत असलेले सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक उल्हासिंग चव्हाण यांना दोन मुले आहेत. लहान मुलाला दारुचे व्यसन असल्याने तो आई – वडील व मोठय़ा भावाकडे दारुसाठी सतत पैशांची मागणी करत होता. घटनेच्या लहान मुलगा रणधीर उल्हासिंग चव्हाण हा घरी दारु पिऊन आला व आईवडिलांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर चाकूने हल्ला (Murder) केला, या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली. यावेळी घरात असलेला मोठा मुलगा प्रितम उल्हासिंग चव्हाण हा धावून आला असता त्याच्यावरदेखील रणधीरने हल्ला केला. यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रितमने बाजूला असलेल्या कोयत्याने रणधीरवर प्रतिहल्ला (Murder) केला त्यात रणधीरचा घटनास्थळी मृत्यू (Murder) झाला. या संदर्भात ग्रामीण पोलीसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रितम याला अटक केली आहे.

आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती
घटना घडल्यावर आरोपी प्रितम उल्हासिंग चव्हाण याने त्याच्या हातून अशा प्रकारचे कृत्य घडल्याची माहीती जिल्हा पोलीस मुख्यालयात फोन करुन दिल्याने ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रितम याला अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, माना पोलीस स्टेशनचे कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, घनश्याम पाटील यांनी हि कारवाई केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment