अपघातात वृध्द ठार : कोळकीत माॅर्निंग वाॅकला गेलेल्या वृध्दास आयशर टेम्पोची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण शहराजवळील कोळकी गावच्या हद्दीत फलटण-दहिवडी रस्त्यावर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असणाऱ्या वृद्धाला आयशर टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत वृद्ध ठार झाला असून आयशर टेम्पो चालक फरार झाला आहे.

फलटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी कोळकी गावच्या हद्दीत संदीप ढाब्याजवळ दहिवडी बाजूकडून फलटण बाजूकडे आबा दशरथ खरात (वय- 63 मूळ रा. कलेढोण, ता. खटाव सध्या रा. नक्षत्र अपार्टमेंट, कोळकी, ता. फलटण) हे माॅर्निंग वॉक करत होते. त्यावेळी दहिवडीवरून फलटण दिशेला येणाऱ्या आयशरने गाडी क्र. (MH.23.AU.7700) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील गाडीने धडक दिली. या आयशरने आबा खरात यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात आबा खरात हे गंभीर जखमी झाले, असताना त्यांना उपचारास दवाखान्यात न नेता आयशर टेम्पो चालक पळून गेला. आबा खरात फलटण येथे उपचार घेत असताना 7.30 वाजणाच्या सुमारास मयत झाले असल्याची फिर्याद सूरज आबा खरात यांनी दिलीय. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Leave a Comment