गिरीश महाजनला जोड्याने हाणला पाहिजे ; धनंजय मुंडेंची जीभ घसरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख पिस्तूलराव महाजन, गिरीजा महाजन असा करत त्यांना थेट जोड्याने हाणले पाहिजे असेच म्हणले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केला होता.

रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा पोहचली असता त्या ठिकाणी भाषण करताना धनंजय मुंडे यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. गिरीश महाजन हे पूरग्रस्तांना भेटायला गेले असता त्यांनी सेल्फी काढण्याचा प्रकार केला होता. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे त्यांच्यावर टीका करत असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

दरम्यान याच प्रसंगी धनंजय मुंडे यांनी सादभाऊ खोत यांच्यावर देखील टीका केली आहे. पूरग्रस्तांना पाण्यातून वाचवण्याचा व्हिडीओ सदा खोत यांनी काढला होता. तो मीडियाच्या लोकांना पैसे देऊन काढला होता. पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीला पुन्हा पाण्यात बसवून त्याला सदा खोत वाचवत आहे असे त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले होते असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. धनंजय मुंडे एवढे जहरी बोलले त्याचा त्यांच्या पक्षाला फायदा होणार की तोटा हे आगामी निवडणुकीत समजून येईल. मात्र त्यांच्या या विधानाने राजकारणाची पातळी मात्र निश्चितच खाली घसरली आहे हे मात्र नक्की म्हणता येईल.

Leave a Comment