महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडून आचारसंहिता लागू केली आहे. तसेच राज्यातील वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असून हा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर करत आजपासून महाराष्ट्रसोबत हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याने दिवाळीत नेमकं कुणाचे फटाके फुटतात हे पाहणे औसुक्यचे ठरणार आहे. या निवडणुकीला महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मागील निवडणुकांच्या तुलनेत या वर्षी दहा दिवस उशिराने आचार संहिता लागू करण्यात आली आहे. 2014 ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. आणि 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होते.