परभणीत उपमपौरांच्या घरावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परभणीचे उपमहापौर माजू लाला यांच्या शाही मस्जिद येथील निवासस्थानी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली

माजू लाला यांच्या घरी कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार आल्यामुळे ,ही कारवाई केले असल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं. मात्र या धाडीत पथकाला येथे काही गैर कृत्य होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे तसं खुलासा पत्र ही पथका कडून माजू लाला यांना देण्यात आलं.

मात्र, माजू लाला यांनी राजकीय दबावात आयोगाने ही कारवाई केली असल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर दबाव आणण्यासाठी निवडणूक आयोगाला विरोधकांना त्रास देणासाठी वापरत असल्याची टीका त्यांनी केली.

Leave a Comment