हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर मधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. याशिवाय हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आजच निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कधी होणार? आचारसहिंता कधीपासून लागू होणार? याबाबत निवडणूक आयोग कोणती घोषणा करते का याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मतदाराचे लक्ष्य असेल.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीचं आधी विधानसभा निवडणुका होतात कि दिवाळीनंतर होतात ते पाहायला हवं. महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करण्याची शक्यता आहे.
Election Commission of India to announce the schedule for General Election to Legislative Assemblies, today. pic.twitter.com/EckI51NcMI
— ANI (@ANI) August 16, 2024
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तीन ते चार टप्प्यांत मतदान होऊ शकते. सप्टेंबरमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याच महिन्याच्या अखेरीस निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.