कराड | अशोकराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या साकुर्डी पेठ 2022-23 ते 2026- 2027 ची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमनपदी शरद जयसिंगराव चव्हाण यांची तर व्हा. चेअरमनपदी शिवाजी यशवंत यादव यांची बिनविरोध निवड झाली.
अशोकराज पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकपदी तुकाराम निवृत्ती डुबल, नवनाथ शिवराम पालेकर, राजकुमार जयसिंगराव चव्हाण, विजय सदाशिव निकम, बाळासो विष्णु चव्हाण, सुनील रघुनाथ पाटील, मसूनाथ अण्णा रसाळ, उत्तमराव विष्णु राऊत, सौ. डॉ. अर्चना दिलीप जानुगडे, सौ. विद्या अर्जुन पाटील, तर तज्ञ संचालकपदी विश्वास यशवंत कणसे, तानाजी रामचंद्र सुर्वे आणि कार्यकारी संचालकपदी शुभम शरद चव्हाण यांची निवड झाली.
यावेळी चेअरमन, व्हा. चेअरमन, व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक निवास शिंदे यांनी केले तर आभार विश्वास कणसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापक, सर्व शाखाप्रमुख, सभासद,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.